यशोगाथा
आमच्या संघटनेच्या अथक प्रयत्नांमुळे वनकर्मचाऱ्यांना मिळालेल्या न्यायाच्या प्रेरणादायी कथा.
सफलता कथा
कु.रेश्मा जानराव वानखडे वनरक्षक अमरावती वनवृत्त यांचे विभागीय चौकशी प्रकरणी अंतिम आदेशान्वये 10 वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करुन दिनांक 01/01/2016 पासून मुळ वेतनावर आणलेले प्रकरण निकाली काढुन सर्व वेतनवाढी मुक्त करण्यात आल्या. संघटनेच्या नेटाने केलेल्या प्रयत्नामुळेच हा अन्याय दुर होऊ शकला.
कु.रेश्मा जानराव वानखडे वनरक्षक अमरावती वनवृत्त यांचा निलंबन कालावधी हा कर्तव्य कालावधी गणून अन्याय दुर करण्यात आला.
कु.रेश्मा जानराव वानखडे वनरक्षक अमरावती वनवृत्त यांचे आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीच्या लाभानुसार रुजू दिनांक 05/01/2012 ते कार्यमुक्त दिनांक 30/09/2019 पर्यंतच्या कालावधीमधील वेतनाची फरकाची रक्कम माहे जून 2024 चे वेतनासोबत अदा करुन अन्याय दुर करण्यात आला.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये क्षेत्रीय वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा न घेण्याबाबत पत्रव्यवहार करुन अधिकारी व कर्मचारी यांचेवरील अन्याय दुर करण्यात आला. पुर्वी हा लाभ फक्त वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्यापुरताच मर्यादीत होता.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये क्षेत्रीय वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा न घेण्याबाबत पत्रव्यवहार करुन अधिकारी व कर्मचारी यांचेवरील अन्याय दुर करण्यात आला.
श्री. भुषण देशमुख वनरक्षक अकोला वन्यजीव विभाग, अमरावती वनवृत्त यांचे 10 वर्षापासून प्रलंबित असेलेले वेतन अदा करुन अन्याय दुर करण्यात आला.
श्री. सदानंद श्रीरामजी पाचंगे वनक्षेत्रपाल अमरावती कार्य आयोजना, अमरावती वनवृत्त यांचे अन्यायकारक बदली प्रकरणी झालेला अन्याय दुर करण्यात आला.
सेवानिवृत्त होणाऱ्या शासकिय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनविषयक लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियम 118 ते 125 च्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत वनप्रशासनास बाध्य करण्यात आले व श्री.नेमराज सुदाम जांभुळकर वनपाल सेवानिवृत्त यांचेवर झालेला अन्याय दुर करण्यात आला.
श्री. ज्ञानेश्वर यादव वनरक्षक, पुसद वनविभाग, यवतमाळ वनवृत्त यांचे अन्यायकारक बदली प्रकरणी झालेला अन्याय दुर करण्यात आला.
श्री. एस.एस.आठवले वनपाल, मेळघाट प्रादेशिक वनविभाग, अमरावती वनवृत्त यांचे अन्यायकारक बदली प्रकरणी झालेला अन्याय दुर करण्यात आला.
श्री. सतिश श्रीरामजी इंगळे वनपाल अमरावती वनविभाग, अमरावती वनवृत्त यांचे प्रलंबित रजा प्रकरणी झालेला अन्याय दुर करण्यात आला.
श्री. मनोज देविदासराव खडसे वनपाल, गुगामल वन्यजीव विभाग, अमरावती वनवृत्त यांचे प्रलंबित रजा प्रकरणी, सेवापुस्तकात नोंदी नसल्याप्रकरणी, प्रलंबित थकबाकी प्रकरणी झालेला अन्याय दुर करण्यात आला. परंतू पाहीजे त्या प्रमाणात रजा प्रकरणी गंभिर अन्याय कायम असल्यामुळे त्यांनी सदर प्रकरणी मा.न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट केले आहे.
मा.न्यायालयाने निकाल दिल्यानंतर होत असलेल्या उशिरामुळे श्री. अरविद इंदोरे लिपीक यांचे बदली प्रकरणी अन्याय दुर करण्यास संघटना यशस्वी ठरली आहे.